बेलापूर लोकल, पोहोचली वांद्र्याला!

  • मुंबई लाइव्ह टीम & निलेश अहिरे
  • परिवहन

"जाना था जपान, पहूंच गये चीन", ही सर्वपरिचीत म्हण सोमवारी रात्री बेलापूर लोकलमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांना प्रत्यक्षात अनुभवायला मिळाली. उतरायचं होतं बेलापूरला, पण ही लोकल थेट वांद्रे स्थानकात जाऊन पोहोचल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

नेमकं काय झालं?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून हार्बर मार्गावरील बेलापूर लोकल रात्री ९.३८ वाजता सुटली. ही लोकल वडाळा स्थानकात थांबून पुढे कुर्ला स्थानकाच्या दिशेने जाणं अपेक्षित होतं. पण तसं घडलं नाही.

कारण काय?

तर, ही लोकल थेट सिग्नल ओलांडून ट्रान्स हार्बर मार्गावरून वांद्र्याच्या दिशेने निघाली. तांत्रिक कारणामुळे या लोककला चुकीचा सिग्नल मिळाल्याची प्राथमिक माहीती आहे.

प्रवाशांचा गोंधळ

हा प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. काही प्रवाशांनी गाडी थांबवायचाही प्रयत्न केला. पण त्याचाही उपयोग झाला नाही. ही लोकल किंग्स सर्कल स्थानक ओलांडून वांद्र्याला जाऊन थांबली.

या प्रकाराने प्रवाशांना नाहक हेलपाटा मरावा लागला. एरवी ओव्हरहेड वायर तुटणे, रुळाला तडा जाणे, इतर त्रांतिक कारणामुळे त्रास सहन करणाऱ्या प्रवाशांना हा अनोखा प्रकारही सहन करावा लागला. झालेल्या घटनेबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली.


हेही वाचा -

प्लास्टिकबंदी इफेक्ट! महापालिकेकडे १२० टन प्लास्टिक जमा

पुढील बातमी
इतर बातम्या