मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलची ६९ लाखांची कमाई

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गारेगार आणि आरामदायी प्रवासाची संधी मिळावी यासाठी एसी लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर एसी लोकल सुरू करण्यात आली. मात्र सुरूवातील या एसी लोकलला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद होता. एसी लोकलचे तिकीट जास्त असल्यानं प्रवाशांनी या लोकलकडे पाठ फिरवली होती. परंतू, सध्या वाढलेल्या उकाड्यामुळं प्रवाशांनी एसी लोकलचा आसरा घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सध्या मध्य रेल्वेवर दिवसभरात एसी लोकलच्या ६० फेऱ्या होत असून, १ ते ७ मार्च या काळात एसी लोकलने ६९ लाख ५३ हजार ०५९ रुपयांची कमाई केली. त्यात सिझन तिकिटांद्वारे मिळालेल्या २७ लाख ९९ हजार २३१ रुपयांचा समावेश आहे. एसी लोकलचे फर्स्ट क्लासच्या १.३ पट महागडे तिकीट खरेदी करण्यापेक्षा ‘सिझन पास’ काढून प्रवासी एसी लोकलचा गारव्याचा आनंद लुटत आहेत. 

मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेनंतर एसी लोकलच्या फेऱ्यांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. नव्या वेळापत्रकात ३६ फेऱ्यांची वाढ करण्यात आली असून, त्यात ३४ एसी फेऱ्यांचा समावेश झाला आहे. त्यामुळं एसी लोकलचे सिंगल तिकीद दर जादा असल्याने तिकीट काढण्याच्या फंद्यात न पडता एसी लोकलचा पास काढण्याचा पर्याय प्रवाशांनी शोधून काढला आहे.

एसी लोकलच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण, बदलापूर, टिटवाळा या सेक्शनमध्ये ४४ फेऱ्या, हार्बरच्या सीएसएमटी ते पनवेल ८ फेऱ्या, पश्चिम हार्बर मार्गावर सीएसएमटी ते गोरेगाव ८ फेऱ्या अशा ६० फेऱ्या चालविण्यात येत आहेत. या सात दिवसांत मध्य रेल्वेच्या ८७,१७८ प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला असल्याची माहिती समोर येत आहे.

तारीख
कार्ड तिकीट
सिझन तिकीट
कमाई
१ मार्च
57,885
5,25,845
5,83,730
२ मार्च
97,410
5,96,553
6,93,963
३ मार्च
1,01,150
4,19,127
5,20,277
४ मार्च
1,25,600
2,31,037
3,56,637
५ मार्च
1,02,875
1,31,264
2,34,139
६ मार्च
1,395
2,75,402
2,76,797
७ मार्च

1,25,46

7,51,040
8,76,505
एकूण

6,11,780

27,99,231
35,42,048

पुढील बातमी
इतर बातम्या