विरारकरही चिल्ड! एसी लोकलची चर्चगेट ते विरार सेवा सुरू

नाताळाच्या दिवशी म्हणजेच २५ डिसेंबरला मोठ्या दणक्यात उद्घाटन झाल्यानंतर एसी लोकल मुंबईकरांच्या सेवेत आली. मात्र ही लोकल पहिल्या टप्प्यात बोरीवली ते चर्चगेटपर्यंतच सुरू करण्यात आल्याने विरारकर थोडे हिरमुसले होते. पण पश्चिम रेल्वेने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारीला चर्चगेट ते विरार अशी एसी लोकल सेवा सुरू करून विरारकरांना थंडगार प्रवासाचा आनंद देऊ केला.

एसी लोकलला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केलं आहे. आतापर्यंत एसी लोकलच्या बोरीवली ते चर्चगेटपर्यंत कमी गर्दीच्या वेळेस केवळ ६ फेऱ्या चालवल्या जात होत्या. पण, १ जानेवारीपासून एसी लोकलच्या फेऱ्या वाढून १२ वर गेल्या आहेत. आठवड्याचे फक्त ५ दिवस ही एसी लोकलची सेवा सुरू राहणार आहे.

एसी लोकलच्या १२ फेऱ्यांपैकी ८ फेऱ्या चर्चगेट आणि विरार स्टेशनदरम्यान फास्ट मार्गावर होतील. मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, भाईदर आणि वसई रोड या प्रमुख स्थानकांवर एसी लोकलला थांबा देण्यात येणार आहे. तर, ३ फेऱ्या चर्चगेट आणि बोरीवलीदरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील. मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे आणि अंधेरी स्थानकांवर या लोकलचे थांबे असणार आहेत. तर, उरलेली १ फेरी महालक्ष्मी ते बोरीवली या धीम्या मार्गावरुन चालवली जाणार आहे. ही लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहे.

एसी लोकलचं १ जानेवारीपासूनचं वेळापत्रक

डाऊन

स्टेशनपासून

ट्रेनची वेळ

महालक्ष्मी

6:58

चर्चगेट

8:54

चर्चगेट

11:50

चर्चगेट

14:55

चर्चगेट

17:49

चर्चगेट

19:49

अप

स्टेशनपासून

ट्रेनची वेळ

बोरीवली

7:54

विरार

10:22

विरार

13:18

विरार

16:22

बोरीवली

18:55

विरार

21:24

पुढील बातमी
इतर बातम्या