'परे'नंतर आता 'मरे'वर सुद्धा धावणार एसी लोकल

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी खूशखबर आहे. कारण आता, मध्य रेल्वे मार्गावर देखील एक वातानुकूलीत लोकल धावणार आहे. मध्य रेल्वे या वातानुकूलीत लोकलच्या वेळापत्रकावर काम करत असून पुढच्या वर्षी ही लोकल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

प्लॅटफाॅर्मची उंची

सुरुवातील ही वातानुकूलीत लोकल मध्ये रेल्वे मार्गावरचं धावणार होती. मात्र, कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसदरम्यान असलेल्या पुलांच्या कमी उंचीमुळे ही लोकल मध्ये रेल्वे मार्गवर चालवण्यात आली नाही. त्यानंतर ही लोकल २५ डिसेंबर २०१७ ला पश्चिम रेल्वे मार्गावर चालवण्यात आली. मात्र, आता ही लोकल मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी तयार झाली आहे.

१० नव्या एसी लोकल

'भेल'ने बनवलेल्या साध्या लोकलमध्ये बदल करून या लोकलचं रुपांतर वातानुकूलीत लोकलमध्ये करून ती चालवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे, पुढील वर्षांत अशा आणखी १० वातानुकूलीत लोकल दाखल होणार आहेत. या १० लोकल जानेवारी महिन्यापासून मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. मात्र या लोकल कुठल्या मार्गावर धावतील हे अद्याप ठरलेलं नाही.


हेही वाचा-

वर्ल्ड बॅँकेचा ४७ एसी लोकलसाठी निधी देण्यास नकार

मध्य रेल्वे मार्गावर आणखी २१० सीसीटीव्ही कॅमेरे


पुढील बातमी
इतर बातम्या