विमान तिकिटांच्या किंमतीत दिवाळीत वाढ नाही

सणासुदीच्या काळात प्रवास करण्यास उत्सुक असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. उत्सव सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच विमान उड्डाणात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा असते.

तथापि, ट्रॅव्हल सर्व्हिस ऑपरेटरचा असा विश्वास आहे की, उत्सव काळात एअरलाईन तिकिटांच्या किंमतीत मोठी मोठी वाढ होणार नाही. तज्ज्ञांचं मत आहे की, दिवाळी जवळ आली की विमान कंपन्या तिकिटांच्या किंमतीत वाढ करतात. पण यंदा कोरोनामुळे प्रवासी ऐनवेळी तिकिट बुक करतील. त्यामुळे तिकिटाच्या किंमतीत अधिक वाढ होणार नाही.

क्लिअर ट्रिपचे आदित्य अग्रवाल म्हणाले की, “या वर्षी देशभर साथीच्या आजारामुळे ग्राहकांनी प्रवासाच्या तारखेच्या जवळ बुक करणं पसंत केलं आहे. उदाहरणार्थ, ऑक्टोबरमध्ये ६७% बुकिंग पुढील दोन आठवड्यांसाठी करण्यात आलं आहे. दिवाळीच्या ३-४ आठवड्यांपूर्वी अग्रेषित बुकिंगचे प्रमाण मागील वर्षाच्या सुमारे २४ टक्के आहे.

गेल्या तीन आठवड्यांत विमान प्रवास वाढल्याची नोंद आहे. “हवाई प्रवासाचा आत्मविश्वास वाढत आहे. गेल्या तीन आठवड्यांत आम्ही उत्सवाच्या प्रवासासाठी अग्रिम बुकिंगमध्ये ४०% वाढ पाहिली आहे. इंडिगोचे आलोक बाजपेयी म्हणाले, दिवाळीच्या जवळपास देशांतर्गत उड्डाणे २० ते २५% टक्क्यांनी वाढली आहेत.

क्लिअरट्रिपनं पुरवलेल्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, बहुतेक लोक आपल्या प्रियजनांबरोबर उत्सव साजरा करण्यासाठी त्यांच्या गावी जातात. याउलट, मागील वर्षातील क्लिअरट्रिपच्या डेटामध्ये गोवा किंवा केरळसारख्या गंतव्यस्थानांमधील प्रवासाची वाढ झाली.

फ्लाइट अ‍ॅग्रीग्रेटरनं सांगितलं की, मुंबई, दिल्ली किंवा बेंगळुरुसारख्या ठिकाणांवरून पटना, वाराणसी, लखनऊ आणि कोलकाता ही उच्च स्थान आहे.

यात्रा डॉट कॉमच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, लोक अनेक महिन्यांपासून अलिप्त राहून प्रवासाची योजना बनवू लागले आहेत. गोवा, उत्तराखंड, राजस्थान, जयपूर आणि हिमाचल प्रदेश यासारख्या ठिकाणी प्रवास करण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांची नवी आवड असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या