गोरेगावमधील एका मेट्रो स्थानकावर धक्कादायक प्रकार घडला. पालकांचं लक्ष नसल्यामुळे दोन वर्षांचा मुलगा मेट्रोमधून अचानक बाहेर आला आणि तिथेच थांबला. मात्र मेट्रो स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यामुळे मोठा अनर्थ टळला. या कर्मचाऱ्याने तात्काळ मेट्रो चालकाला ट्रेन सुरू करण्यास थांबवलं. त्यानंतर मेट्रोचं दार उघडलं आणि मुलगा पुन्हा सुखरुप आत गेला.
मुंबई मेट्रोच्या बांगुर नगर मेट्रो स्टेशनवर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन वर्षाचा मुलगा मेट्रोत चढताना दरवाजे बंद झाले आणि तो दरवाजाबाहेरच थांबला. त्याचे पालक मात्र मेट्रोच्या आत शिरले. त्यांचं लक्ष नसल्यानं तो मुलगा तसाच मेट्रोबाहेर थांबला. नंतर मेट्रोचे दरवाजे बंद झाल्याने तो मुलगा कावराबावरा झाला.
दरवाजे बंद झाले तरीही तो मुलगा दरवाजाजवळ येऊन आत जाण्याचा प्रयत्न करू लागला. मेट्रो सुरू होणार इतक्यात एका कर्मचाऱ्याने ते पाहिलं आणि त्याने ड्रायव्हरला मेट्रो सुरू न करण्याच्या सूचना दिल्या. नंतर तत्परतेने तो कर्मचारी त्या मुलाकडे धावत गेला.
हेही वाचा