ST कर्मचारी कामावर आले तर निलंबन मागे - अनिल परब

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. सोमवारपर्यंत जे ST कर्मचारी कामावर येतील त्यांना कामावर घेतलं जाईल, त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

पुढे ते म्हणाले की, कर्मचारी कामावर आले आहेत, त्यांना वेतनवाढ दिली आहे. जे कामावर येतील त्यांना वेतनवाढ दिली जाईल.

परब म्हणाले की, सोमवारपर्यंत जे कर्मचारी कामाला येतील त्यांना कामावर घेतलं जाईल. त्यानंतर निलंबनाची कारवाई केली जाईल.  

निलंबित कामगार यांनी ही कामावर यावं.  त्यांना ही संधी दिली जाईल.  जर कुणाला अडवण्यात आलं तर त्यांना पोलीस संरक्षण दिलं जाईल, असंही ते म्हणाले.

सोमवारपर्यंत आम्ही मेस्मा लावणार नाही. २०१८ च्या नियमानुसार एसटी ही अत्यावश्यक सेवेत येत आहे. त्यामुळे मेस्माची कारवाई केली आणि करता येते, असंही ते म्हणाले.

परब म्हणाले तरीही माणुसकीच्या दृष्टीनं विचार करून कामगारांना संधी दिली जाईल. आतापर्यंत एसटीचं ५५ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे, असंही परब यांनी सांगितलं.

परब यांनी सांगितलं की, एक महीना जे कामागार कामावर नव्हते त्यांना पगाराला मुकावं लागणार आहे.  त्याला नेते जबाबदार आहेत मात्र त्याची नुकसान नेते देणारं नाहीत, असंही ते म्हणाले.

परब म्हणाले की,  अधिकाऱ्यांशी मी बोललो. त्यांचं म्हणणं आहे की कामगार यायला तयार आहेत. जवळपास 10 हजार कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.  

सदाभाऊ खोत आणि पडळकर यांना आमची भूमिका मान्य होती पण ते कर्मचारी यांना समजवण्यात कमी पडले, असं परब म्हणाले.  

पुढील बातमी
इतर बातम्या