तब्बल 30 वर्षांनंतर 'या' सुपरफास्ट ट्रेनची घोषणा

भारतीय रेल्वे मुंबई (mumbai) आणि बेंगळुरू (bangalore) दरम्यान एक नवीन सुपरफास्ट ट्रेन सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही रेल्वे जवळजवळ तीन दशकांपासून प्रलंबित होती.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (ashwini vaishnav) यांनी बंगळुरू दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ही घोषणा केली.

सध्या मुंबई ते बेंगळुरू मार्गावरील उद्यान एक्सप्रेस धावत आहे. या एक्सप्रेसवर दोन्ही शहरातील प्रवाशांचा अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे या नवीन रेल्वेचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुंटकल आणि कलबुर्गी मार्गे धावणारी उद्यान एक्सप्रेस (udyan express) बेंगळुरू ते मुंबई पर्यंत 23 तासांपेक्षा जास्त वेळ घेते आणि उलट मुंबईहून बेंगळुरूच्या दिशेने जवळजवळ 22 तास लागतात.

तसेच ही रेल्वे सहसा पूर्णपणे बुक केलेली असते ज्यामुळे प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळण्यावर मर्यादा येते

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही नवीन रेल्वे सेवा हुबळी मार्गे धावण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ 20 तासांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. 

तसेच या रेल्वेमुळे मुंबई, पुणे (pune), सोलापूर शहरातील प्रवाशांना बेंगळुरूपर्यंतचा प्रवास करण्यासाठी एक सोईस्कर होणार आहे.

या गाडीची अधिकृत लॉंच तारीख निश्चित झालेली नसली तरी या मार्गावर वारंवार ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी या घोषणेचे स्वागत केले आहे.

विशेषतः दोन प्रमुख मेट्रो शहरांमधील (metro city) चांगल्या कनेक्टिव्हिटीची वाढती मागणी लक्षात घेता. हा निर्णय घेतला असल्याचेही सुत्रांकडून सांगितले जात आहे.


हेही वाचा

मुसळधार पावसामुळे भिवंडी, कल्याणमधील वाहतूक विस्कळीत

कल्याण: शहाड पूल 18 दिवसांसाठी बंद

पुढील बातमी
इतर बातम्या