आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान उड्डाणांवर घातलेली बंदी डीजीसीएने ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली. या बंदीची मुदत ३१ ऑगस्टला संपणार होती. मात्र,  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन डीजीसीएने हा निर्णय घेतला आहे. 

परदेशातून भारतात येणारी प्रवासी विमाने आणि भारतातून बाहेर जाणारी प्रवासी विमाने यांच्या उड्डाणांना डीजीसीएने कोरोनामुळे बंदी घातली होती. ती आता पुन्हा ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. मालवाहतूक आणि काही ठिकाणच्या प्रवासी वाहतुकीला परवानगी आहे. मात्र सरसकट आंतरराष्ट्रीय विमानांना अजून परवानगी मिळालेली नाही.

आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक  २३ मार्च २०२० पासून बंद ठेवण्यात आली आहे. त्याला आतापर्यंत अनेकदा मुदतवाढ दिली आहे. ही मुदत येत्या ३१ ऑगस्टला संपणार होती. मात्र ती पुन्हा ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. अमेरिका, यूके, युएई, केनिया, भूतान आणि फ्रान्स यासह अनेक देशांशी भारताचे 'एअर बबल' करार आहेत. याअंतर्गत एअरलाईन कंपन्या दोन देशांमध्ये विमान चालवू शकतात.

पुढील बातमी
इतर बातम्या