'बी सेफ' ट्रेन प्रवास

  • सय्यद झैन & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

कुर्ला - वाढत्या लोकल अपघातांची संख्या लक्षात घेता प्रवाशांमध्ये जागृती करण्यासाठी कुर्ला रेल्वे स्टेशनवर जीआरपीच्या वतीनं 'बी सेफ' नावाच्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. प्रवास करताना सुरक्षितता बाळगण्याचं आवाहन प्रवासी आणि मुलांना या उपक्रमान्वये करण्यात आलं. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेचीही या वेळी उपस्थिती होती. प्रवास करताना ट्रेनच्या दरवाज्यात उभं राहू नका, रेल्वेचे रुळ ओलांडू नका तसंच स्टंट करू नका, अशा अनेक गोष्टी तिनं उपस्थितांना समजावल्या.

पुढील बातमी
इतर बातम्या