कोरोनामुळं बेस्टच्या प्रवासी संख्येत व महसूलात वाढ

कोरोनाला प्रादुर्भाव (coronavirus) नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईत लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन (lockdown) आता हळुहळू शिथिल होत आहे. असं असलं तरी अद्यापही मुंबईची लोकल (mumbai local) पूर्ण क्षमतेनं सुरू झालेली नाही. परिणामी प्रवाशांचा सर्व भार बेस्ट बसवर (best bus) पडत आहे. लोकलची गर्दी बेस्ट बसवर आल्यानं प्रवाशांची प्रवासादरम्यान गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रमानं बस पूर्ण क्षमतेनं चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

बेस्टनं प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीची (msrtc) मदत घेतली आहे. परिणामी बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे (passengers) प्रमाण वाढत असून, बेस्ट आणि प्रवासी आता पूर्वपदावर येत असल्याचं चित्र आहे. बेस्टनं दिवसागणिक सुमारे २३ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. २०१८ मध्येही दिवसागणिक बेस्टनं प्रवास करत असलेल्या प्रवाशांचे प्रमाण हेच होते. विशेषत: कोरोना काळात बेस्टनं प्रवाशांना मोठा दिलासा दिला असून, लॉकडाऊन काळात बेस्टकडे मुंबईची लाईफलाइन म्हणून पाहिलं जात आहे.

जूनपासून नोव्हेंबर या कालावधीचा विचार केला असता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात बेस्टनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण वाढले आहे. जून महिन्यात हे प्रमाण ८ लाख होतं. जुलै महिन्यात हे ९ लाख झालं. ऑगस्ट महिन्यात १० लाख, तर सप्टेंबर महिन्यात १८ लाख झालं. ऑक्टोबर महिन्यात हे प्रमाण २१ लाख आणि आता नोव्हेंबर महिन्यात बेस्ट बसनं प्रवास करणाऱ्यांचं प्रमाण २३ लाख झालं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या