'प्रवाशांशी थेट भेट'

  • प्रेसिता कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

शीव - विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम यांच्या अंतर्गत बेस्ट प्रवासी वाढवण्याकरता प्रवाशांशी 'थेट भेट' हा उपक्रम प्रतीक्षानगर आगार येथे 29 जानेवारीला राबवण्यात आला. प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्यासाठी बेस्ट प्रशासनाने अनेक उपाययोजना अंमलात आणण्याचं ठरवलं आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून प्रवाशांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्या कशाप्रकारे अंमलात आणल्या जाऊ शकतील यावर चर्चा करण्यासाठी हा उपक्रम 7 जून 2015 पासून राबवण्यास सुरुवात करण्यात आली होती. तर, या अभियानांतर्गत प्रतीक्षानगर आगार येथे प्रवाशांशी चर्चा सत्र आयोजित केले गेले.

या वेळी चर्चासत्रात प्रवाशांनी बेस्ट अधिकाऱ्यांशी संवाद साधून अनेक सूचना आणि त्यावरील योजना जाणून घेतल्या.

प्रवाशांनी मांडलेले मुद्दे

  1.  बसच्या संख्येत वाढ
  2.  बसस्टॉपचे एकमेकांपासून असणारे अंतर
  3.  बस पास आणि तिकीट भाडे

प्रवाशांनी नमूद केलेल्या या सूचनांवर आणि मुद्द्यांवर लवकरात लवकर बेस्टमार्फत उपाययोजना केल्या जातील असे आगार व्यवस्थापक प्रवीण शिंदे यांनी सांगितले.

पुढील बातमी
इतर बातम्या