बेस्ट कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर धरणे

बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याच्या प्रमुख मागणीसह बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने बुधवारी मंत्रालयावर मोर्चा काढण्याची तयारी केली होती. मात्र, राणीबाग ते मंत्रालय दरम्यान काढण्यात येणाऱ्या मोर्चाला राज्य शासनानं परवानगी नाकारली आहे. त्यामुळं आझाद मैदानातच धरणे देऊन शिष्टमंडळ आपलं निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार आहे.

महापालिकेनं बेस्ट उपक्रमाला निधी व कमी व्याजात कर्ज देऊन आधार दिला आहे. मात्र पालक संस्था असल्यानं महापालिका अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प विलीन करण्याची मागणी संघटनांकडून केली जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप कृती समितीकडून करण्यात आला आहे. ७ ऑगस्ट २०१७ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आश्वासनही दिले होते. परंतु त्यानंतरही मागणी मान्य झाली नाही. याच मागण्यांसाठी 

मंगळवारी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ‘बेस्ट’ कर्मचारी संघटनांनी दिला होता. मात्र, राज्य सरकारने मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे बुधवारी दुपारी ३ वाजता आझाद मैदानात कर्मचारी जमा होणार आहेत. त्यानंतर शिष्टमंडळ आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या