बेस्टच्या विद्युत विभागाची खासगीकरणाकडे वाटचाल

बेस्टच्या विद्युत विभागाची खासगीकरणाकडे वाटचाल होत असल्याची माहिती समोर येत आहे. बेस्टच्या वाहतूक विभागात खासगी बस वापरण्यास सुरुवात केल्यानंतर उपक्रमानं आता विद्युत विभागातही खासगी कंत्राटदारांचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे. वीज बिघाड दुरुस्ती विभागाच्या खासगीकरणासाठी बेस्ट उपक्रमाने पहिले पाऊल टाकले आहे.

स्वत:च्या बस चालवण्यापेक्षा भाड्यानं बस चालवणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं असल्यानं बेस्टनं ३ हजारहून अधिक बस भाड्यानं घेण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात ८०० खासगी बस घेण्यात आल्या. यात चालक कंत्राटदाराचा असतो, तर वाहक (कंडक्‍टर) बेस्टचा असतो. मात्र आता नव्या भाड्याच्या बस घेताना वाहकही कंत्राटदाराकडून घेण्यात येणार आहे.

या निर्णयामुळं वाद पेटलेला आहे. त्याचबरोबर परिवहन विभागातील रंगकाम, साफसफाई अशी कामेही कंत्राटदाराकडून करून घेतली जातात. बेस्टच्या परिवहन विभागात कंत्राटी पद्धतीचा शिरकाव झाला होता. मात्र, आता वीजपुरवठा विभागातही कंत्राटदारांचा शिरकाव होणार आहे. वीज बिघाड दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी ४८ लाख रुपयांचा खर्च प्रशासन करणार आहे. तसा प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या बेस्ट समितीच्या पटलावर मांडण्यात आला.

पुढील बातमी
इतर बातम्या