New year: नववर्ष स्वागतासाठी बेस्टची अतिरिक्त बससेवा

नववर्ष स्वागतासाठी अनेक मुंबईकर रात्री उशीरापर्यंत घराबाहेर असतात. वर्षाचा अखेरचा दिवस ३१ डिसेंबर म्हणजेच थर्टीफर्स्ट पार्टी साजरी करण्यासाठी वेगवेगळ्या रेस्तरॉ व हॉटेलमध्ये मोठी गर्दी असते. रात्री उशीरापर्यंत या पार्ट्या सुरू असल्यानं मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या अनेक मार्गावर बेस्ट उपक्रमातर्फे जादा बसगाड्या चालविण्यात येणार आहेत.

अतिरिक्त बससेवा

गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराईसह शहरातील इतर चौपाट्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या पर्यटकांच्या सुविधेसाठी मंगळवारी रात्री २० बस सेवा पुरवण्यात येणार आहेत. बेस्टच्या क्र. ७ मर्या., १११, ११२, २०३, २३१, २४७ आणि २९४ या मार्गांवर या अतिरिक्त बससेवा आहेत.

जादा बससेवांची सुविधा

बेस्टनं सहा बसथांब्यावरून नववर्षांसाठी जादा बससेवांची सुविधा दिली आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते राणी लक्ष्मीचौक मार्गावरील ७ मर्या., ही बस मध्यरात्री १२.१५ आणि १२.३० वा. सुटेल. बस क्र. १११ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी रा. ११.३० वा., रा. १२ वा. आणि रा. १२.१५ वा. सुटेल. बस क्र. ११२ ही डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ते चर्चगेट स्थानकासाठी रा. १० वा., रा. १०.१५ वा., रा. १०.३० वा., रा. १०.४५ वा., रा. ११ वा. सोडण्यात येतील.

अंधेरी पश्चिमेतून जुहू किनाऱ्यासाठी रा. ११ वा., रा. ११.१५ वा., रा. ११.३० वा. सुटेल. सांताक्रूझ (पश्चिम) स्थानकातून जुहू बस आगारासाठी रा. १० वा., रा. १०.२० वा., रा. १०.४५ वा., रा. ११ वा., रा. ११.१५ वा. सुटतील. बोरिवली स्थानक पश्चिमेपासून गोराई किनाऱ्यासाठी रा. १०.१५ वा., रा. १०.३० वा. बस सेाडण्यात येतील. प्रवाशांच्या मदतीसाठी डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई बीच, चर्चगेट आणि सीएसएमटी या ठिकाणी वाहतूक अधिकारी, बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या