मुंबई विमानतळ ते ठाणे मार्गावर बेस्टची इलेक्ट्रिक बससेवा सुरू

विमानानं प्रवास करणारे अनेक प्रवासी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आतंरराष्ट्रीय विमानतळ ते ठाणे असा प्रवास करतात. या प्रवासासाठी त्यांना टॅक्सी किंवा खासगी वाहतुकीनं प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी त्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागतात. त्यामुळं या प्रवाशांसाठी आता बेस्टनं बस सेवा सुरू केली आहे.

विमान प्रवास करून मुंबईत आलेल्या प्रवाशांना ठाणे व दक्षिण मुंबईत जायचे असल्यास आता आरामदायी व स्वस्त दरात प्रवास उपलब्ध होणार आहे. बेस्ट इलेक्ट्रिक बस सेवा या मार्गावर सुरू केल्या आहेत. त्यामुळं आता प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

१ नोव्हेंबरपासून बेस्टनं वाहतुकीला सुरुवात केली आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते ठाणे प्रवासासाठी १२५ रुपये तिकीट मोजावे लागणार आहेत.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते वाशी या मार्गावरही बस सेवा सुरू झाली आहे.  

विमानतळ ते बोरिवली - 100

विमानतळ ते वाशी - 150

पुढील बातमी
इतर बातम्या