पुन्हा भाडेवाढ? बेस्टचा अर्थसंकल्प होणार सादर

मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या बेस्टचा तोटा कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. आता या तोट्यातून मार्ग काढण्यासाठी बेस्ट बसच्या तिकिटांसह वीजदरांत वाढ होण्याची शक्यता आहे.  

बेस्ट उपक्रमाचा 2019-20 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सोमवारी सादर होणार आहे. दरम्यान या अर्थसंकल्पात मुंबईकरांना पुन्हा एकदा भाडेवाढीला सामोरे जावं लागणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बेस्टने यापूर्वी तोट्यातून बाहेर पडण्यासाठी भाडेवाढीचा पर्याय स्वीकारला होता. मात्र तरीही तोटा कमी होत नसल्याने या अर्थसंकल्पात पुन्हा भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

तरीही अर्थसंकल्प माडणार

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी बेस्ट उपक्रमाला तोटा आणि कर्जाच्या सापळ्यातुन मार्ग काढण्यासाठी बदल राबवले. त्याचप्रमाणे या बदलामध्ये अनेक सुधारणा सुचवून तोटा कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तरी देखील उपक्रमावरील तोट्याचा भार कमी झाला नसताना बेस्टचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

बेस्टचा हा अर्थसंकल्प उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडे यांच्याकडून बेस्ट समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांना सादर केला जाणार आहे. यामध्ये बेस्टच्या तिकीट आणि वीजदरांमधील वाढीचा मुद्दा असल्याची, चर्चा सुरू आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या