गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी ५२ विशेष रेल्वे फेऱ्या

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी ५२ विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

दिवा-चिपळूण आणि मुंबई-मंगळुरू मार्गावर या विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. यामुळे उत्सवकाळात धावणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांची एकूण संख्या २०८ वर पोहोचली आहे.

दिवा-चिपळूण मेमूच्या ३६ फेऱ्या

गाडी क्रमांक ०११५५ मेमू दिवा स्थानकातून रोज सायंकाळी ७.४५ ला सुटेल आणि चिपळूणला दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १.२५ वाजता पोहोचेल. ०११५६ परतीचा प्रवास दुपारी एक वाजता सुरू होणार असून दिवा स्थानकात ती सायंकाळी नऊ वाजता पोहोचेल.

१३ ते १९ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान गाडी धावणार आहे. ही गाडी आठ डब्यांची असणार आहे.

कुठे थांबा? 

त्याला पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी असे थांबे असतील.

मुंबई-मंगळुरू विशेष एक्स्प्रेसच्या १६ फेऱ्या:

०११६५ ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.४० वाजता मंगळुरू येथे पोहोचेल. ०११६६ परतीचा प्रवास सायंकाळी ६.४० ला सुटणार असून दुपारी १.३५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल. ही २० डब्यांची गाडी असणार आहे.

कुठे थांबे? 

गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड ब्यंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल आणि ठोकूर असे थांबे असतील.

आरक्षण 

विशेष गाड्यांसाठी ३ जुलैपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर आरक्षण खुले झाले आहे.


हेही वाचा

मुंबई-गोवा ‘वंदे भारत’मध्ये लवकरच स्लिपर कोच, 'या' तारखेपासून होणार बदल

मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ट्रेनमधून व्हिस्टाडोम डबे हटवले, 'या' एक्स्प्रेसचा समावेश

पुढील बातमी
इतर बातम्या