नेरुळ-पनवेल दरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील नेरुळ आणि पनवेल दरम्यान शुक्रवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. २८ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून हा ट्रॅफिक ब्लॉक सुरू होणार आहे. प्रवाशांनी या ब्लाॅकची दखल घेऊनच प्रवास करावा, असं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे.

कुठल्या कामासाठी?

मध्य रेल्वेने बेलापूर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामासाठी शुक्रवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक घेतला आहे. हार्बर मार्गावरील अप दिशेला मध्यरात्री ००.३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत तर डाऊन दिशेला मध्यरात्री २.१० ते सकाळी ७.१० वाजेपर्यंत नेरुळ ते पनवेल मार्गावर ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

कुठली लोकल रद्द?

ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून सुटणारी पहाटे ४.३२ आणि सकाळी ६.०८ ची पनवेल लोकल रद्द करण्यात आली आहे. तर ट्रान्स हार्बरवरील पनवेलहून सुटणारी पहाटे ५.१२ आणि ७.०४ ची ठाणे लोकल रद्द करण्यात आली आहे.

विशेष लोकल सेवा

दरम्यान, हार्बर मार्गावरील १७ लोकल सेवा तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ५ लोकलसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.


हेही वाचा-

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री 'परे' आणि 'मरे'वर विशेष लोकल, इथे पहा वेळापत्रक!


पुढील बातमी
इतर बातम्या