मध्य रेल्वेचा फुकट्यांना दणका, १२१ कोटींचा दंड वसूल

लोकलने फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. मध्य रेल्वेने गेल्या वर्षी म्हणजेच २०१७ च्या एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्यांत फुकट्या प्रवाशांकडून १२१ कोटींचा दंड वसूल केला आहे. आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने फुकटे प्रवासी, भिकारी, फेरीवाले यांच्याविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे.

फुकट्यांच्या संख्येत वाढ

२०१७ च्या डिसेंबर महिन्यात २ लाख ६ हजार एवढ्या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत ८ कोटी ७६ लाख एवढा दंड वसूल करण्यात आला आहे. तर २०१६ मधील डिसेंबर महिन्यात १ लाख ८० हजार फुकट्या प्रवांशांवर कारवाई करण्यात आली होती, त्यातून ७ कोटी ६८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण १४.१ टक्क्यांनी वाढलं आहे. 

एका महिन्यात इतका दंड वसूल

एप्रिल ते डिसेंबर २०१६ मध्ये एकूण २४ लाख ४१ हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली होती. फक्त डिसेंबर या एक महिन्यात २० लाख ६९ हजार फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आलं असून फुकट्या प्रवाशांच्या आकडेवारीत १७.९४ टक्कयांनी वाढ झाली आहे. तर, दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास करणाऱ्यांमध्ये ४३९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. अशा फुकट्या प्रवाशांकडून ३ लाख ५६ हजार रुपये वसूल करण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या