मध्य रेल्वेवर ट्रॅकला तडा; ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

दादर आणि माटुंगा स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजून ३३ मिनिटांची खोपोलीला जाणारी ट्रेन २൦ ते २५ मिनिटं प्लॅटफॉर्मवरुन सुटली नसल्याचं काही प्रवाशांनी सांगितलं आहे.

४-५ प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी बंद

संध्याकाळी घरी परतण्याच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, दादरच्या फास्ट ट्रेन स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहेत. शिवाय, आणखी काही काळ ४ आणि ५ नंबर प्लॅटफॉर्मवरून गाड्या सोडल्या जाणार नसल्याची अनाऊन्समेंट स्टेशनवर केली जात आहे. त्यामुळे फास्ट ट्रेनच्या प्रवाशांना स्लो ट्रेनमधूनच प्रवास करण्याचा पर्याय सध्या उपलब्ध आहे.

प.रे.वरही १०० गाड्यांचं वेळापत्रक बिघडलं

शुक्रवारी सकाळी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सांताक्रूझ आणि विलेपार्लेदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेवरील दोन्ही मार्गांवरची वाहतूक २൦ ते २५ मिनिटे उशिरा सुरू होती. त्यामुळे पुढील सर्व गाड्यांवर त्याचा परिणाम झाला. दरम्यान, या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेवरील २൦ लोकल रद्द करण्यात आल्या आणि जवळपास १०० लोकलचं वेळापत्रक बिघडलं.


हेही वाचा

फर्स्ट क्लासच्या डब्यात पोलिसांना का ‘नो एण्ट्री’?

पुढील बातमी
इतर बातम्या