मध्य रेल्वेच्या ईएमयू सेवेला ९३ वर्षे पूर्ण

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

मध्य रेल्वेवर पहिल्यांदा धावलेल्या ईएमयू (इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट) या सेवेला ९३ वर्ष पूर्ण झाली आहेत. ३ फेब्रुवारी १९२५ साली विक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकातून ही पहिला सेवा सुरू करण्यात आली होती. त्यावेळी विक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला ही चार रॅकची पहिली लोकल हार्बर मार्गावरुन धावली होती.

येत्या काळात हार्बर आणि ट्रान्सहार्बर लाइनवर ईएमयू गाडीच्या जागी बम्बार्डिअर रेक्स धावण्याच्या प्रयत्नात असल्याचंही मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

सेवेचा वर्षानुसार इतिहास

  • १९२५ - हार्बर मार्गावर ४-डब्बा

  • १९२७ - मेन-हार्बर मार्गावर ८-डब्बा

  • १९६३ - मेन-हार्बर मार्गावर ९-डब्बा

  • १९८६ - मुख्य मार्गावर १२-डब्बा

  • १९८७ - १२ - डब्ब्यांची कर्जत

  • २००८ - कसाराच्या दिशेने १२-डब्बा

  • २०१० - ट्रान्सहार्बर मार्गावर १२-डब्बा

  • २०११ - सर्व मुख्य मार्गावरील सेवा १२-डब्बा

  • २०१२ - मुख्य मार्गावर १५ - डब्बा

  • २०१६ - हार्बर मार्गावर सर्व १२-डब्बा

दररोज ट्रेनची सेवा -

  • १९२५ - दररोज १५० सेवा
  • १९३५ - दररोज ३३० सेवा
  • १९४५ - ४८५ दररोज सेवा
  • १९५१ - ५१९ दररोज सेवा
  • १९६१ - ५५३ दररोज सेवा
  • १९७१ - ५८६ दररोज सेवा
  • १९८१ - ७०३ दररोज सेवा
  • १९९१ - १९९५ दररोज सेवा
  • २००१ - १०८६ दररोज सेवा
  • २०११ - १५७३ दररोज सेवा
  • २०१८ - १७३२ दररोज सेवा
पुढील बातमी
इतर बातम्या