मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा ठप्प

मागील चार दिवसांपूर्वीच सकाळी ऐन गर्दीच्या वेळी कुर्ला ते सीएसएमटी स्थानकादरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास खोळंबली. शुक्रवारी करीरोड-परळ दरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सकाळच्या वेळी विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.

करीरोड परळदरम्यान बिघाड

करिरोड ते परळ स्थानकादरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल काहीकाळासाठी मध्येच बंद पडली. परिणामी मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे.सकाळी ६.४५ च्या दरम्यान हा तांत्रिक बिघाड झाला. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या ५ लोकल एकामोगमाग उभ्या होत्या. तर काही प्रवाशांनी चालत जाऊन दादर आणि परळ स्टेशन गाठलं.

धीम्या मार्गावरील वाहतूकही जलद मार्गावरुन वळवण्यात आली आहे.रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत 7.12 च्या दरम्यान हा मार्ग सुरळीत केला. मात्र अजूनही मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या