परळ टर्मिनसला कर्मचारी संघटनांचा विरोध

  • राजश्री पतंगे & अतुल चव्हाण
  • परिवहन

मध्य रेल्वेवरील परळ वर्कशॉप बंद करून ते नागपुरला हलवण्याचा घाट मध्य रेल्वेकडून घालण्यात आला आहे. या वर्कशॉपच्या जागेवर परळ टर्मिनस उभारण्याची योजना मध्य रेल्वे बोर्डाकडून आखण्यात आली आहे. याला मध्य रेल्वेवरील कर्मचारी संघटनांनी मात्र विरोध दर्शवला आहे.

म्हणून कर्मचाऱ्यांचा विरोध

परळ येथील हे वर्कशॉप जवळपास १३८ वर्ष जुनं आहे. याठीकणी २ हजार ७०० कर्मचारी काम करतात. जर हे वर्कशॉप बंद झालं तर या कर्मचाऱ्यांचं काय होणार? असा सवाल कर्मचारी संघटनानी उपस्थित केला आहे. तसंच मध्य रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि अजून इतरही टर्मिनस असतांना मग पुन्हा परळला टर्मिनस कारायची गरज काय? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

याच वर्कशॉपला विकसित करा

सध्या परळ येथील वर्कशॉपमध्ये कोट्यवधी रुपायांच्या मशिनी आहेत. ज्या येथुन हलवल्यास त्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. येथे नॅरोगेजचं इंजिन, गाड्यांच्या डब्यांची देखभाल आणि दुरुस्ती अशा कामांबरोबरच याठिकाणी एलएचबी प्रकारातील कोचेस तयार केले जातात. राजधानी सारख्या गाड्यांध्ये अशा कोचेसचा वापर केला जातो. अशी माहिती सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या उपाध्यक्षांनी दिली.

परळ वर्कशॉपला अधिक विकसित केल्यास त्याचा जास्त फायदा कर्मचारी आणि रेल्वे दोन्हीकडे होऊ शकतो. याठिकाणी हे टर्मिनस उभारण्यापेक्षा शहराबाहेर हे टर्मिनस तयार करण्यात यावं, अशी सूचना कर्मचारी संघटनांनी केली आहे.

- अमित भटनागर, उपाध्यक्ष, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ

पुढील बातमी
इतर बातम्या