फुकट्यांना मध्य रेल्वेचा दणका, १५३ कोटींचा दंड वसूल

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांना चांगलाच दणका दिला आहे. फुकट्या प्रवाशांविरोधात राबवलेल्या मोहिमेत विनातिकीट आणि बेकायदेशीर सामानाची वाहतूक करणाऱ्या प्रवाशांकडून २൦१७ -१८ मध्ये १५३ कोटी ८२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, विना तिकीट प्रवास केलेल्‍या ३१. ४५ लाख गुन्ह्यांची नोंद करण्‍यात आली आहे.

गुन्ह्यांत वाढ

रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षी २൦१६ -१७ मध्‍ये २६.८८ लाख गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होता. आता यामध्‍ये १६.९९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागच्‍या वर्षी दंडाच्‍या रुपात १२८.६३ कोची रुपयांचा दंड वसूल करण्‍यात आला होता. अशाप्रकारे यामध्‍ये १९.८५ टक्क्यांनी वाढ झाली.

मागच्या वर्षी इतका दंड वसूल

मार्च २൦१८ दरम्‍यान आरक्षित प्रवासी तिकीट हस्‍तांतरणाचे १९९ प्रकरणांची नोंद झाली आणि दंडाच्‍या रुपात१.८१ लाख रूपये वसूल करण्‍यात आले. दरम्यान, प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या