ओव्हरहेड वायर तपासणीचे काम काही मिनिटांत

रेल्वे रुळांवरील ओव्हरहेड वायरच्या तपासणीसाठी लेझर आणि अॅपआधारित ‘ओएचई मापन गेज’ यंत्रणा मुंबई विभागाने विकसित केली आहे. या यंत्रणेमुळे ओव्हरहेड वायर तपासणीचे तासांचे काम मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. ही यंत्रणा हाताळण्यास सहज शक्य असल्याने तपासणीसाठी अवजड टॉवर वॅगनच्या वापराला नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

डोंबिवली, कुर्ला, ठाणे येथील टॉवर वॅगन शेडमधून टॉवर वॅगन तयार केली जाते. तत्पूर्वी ब्लॉक तयार करून त्याची मंजुरी घेतली जाते. ब्लॉकमुळे वाहतूक बंद करावी लागत असल्याने ब्लॉक अनेकदा नाकारण्यात येतात.

ब्लॉक मंजुरीनंतर मनुष्यबळाची नेमणूक, डिझेलची उपलब्धता केली जाते. त्यानंतर लोकल थांबवून रुळांवर टॉवर वॅगन संबंधित स्थळी पोहोचते. त्यानंतर हाताने आकड्यांची नोंद केली जाते.

नव्या यंत्रणेचे फायदे

  • जीपीएस सुविधेसह रूळ आणि ओव्हरहेड वायर यांमधील उंची तसेच रुळांमधीलअंतर मोजणे शक्य आहे. त्याची नोंद स्वयंचलित पद्धतीने घेता येणे शक्य आहे.
  • अत्याधुनिक लेसर तंत्रज्ञान वापरून जलद, सुरक्षित आणि अचूक
  • ओएचईचे मापन शक्य झाले आहे.
  • यंत्रणा हलकी आणि हाताळण्यास सोपी असल्याने टॉवर वॅगनची गरज नाही.
  • ब्लॉक - नव्या यंत्रणेत ब्लॉकची गरज नाही. (ब्लॉकशिवाय टॉवर वॅगन मुख्य रुळांवर आणली जात नाही)
  • कर्मचारी - नव्या यंत्रणेत १ - २ कर्मचारी ( टॉवर वॅगनमध्ये किमान ५-१०)
  • वेगवान चाचणी - प्रत्येक स्थान मोजण्यासाठी फक्त ५ ते १० मिनिटे लागतात. (प्रत्येक स्थानासाठी एक तास)

सहा महिन्यांत ७० यंत्रणा

मध्य रेल्वेच्या कुर्ला ओव्हरहेड वायर डेपोमध्ये ही यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. सध्या एक ‘ओएचई मापन गेज’ यंत्रणा यशस्वीपणे कार्यान्वित आहे. येत्या ६ महिन्यांत ७० यंत्रणा तयार करण्यात येणार आहे.


हेही वाचा

मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ 17 ऑक्टोबरला देखभालीसाठी बंद

भारताची शाही ट्रेन डेक्कन ओडिसी तीन वर्षांनंतर पुन्हा सुरू

पुढील बातमी
इतर बातम्या