मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांना मिळणार राॅयल एनफिल्ड बुलेट

मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांची सर्व कामं अगदी सोप्या आणि जलदगतीनं व्हावीत, यासाठी मध्य रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच अारपीएफ जवानांना मोटारसायकल देण्यात येणार आहेत. मुख्य म्हणजे, चांगल्या प्रमाणात जवानांना गस्त घालता यावी, यासाठी जवानांना रॉयल इनफिल्ड बुलेट दिल्या जाणार आहेत. जवानांना एकूण ५५ राॅयल एनफिल्ड देण्यात येणार आहेत. रेल्वे मार्गात एखादी लोकल गाडी अचानक बंद पडली किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास, या दुचाकी जवानांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.

अारपीएफ मुंबई विभागाला २२ बाइक्स

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाला एकूण ५५ रॉयल इनफिल्ड बाईक देण्यात येणार आहेत. त्यापैकी २२ बाइक मध्य रेल्वेच्या आरपीएफ मुंबई विभागाला देण्यात येणार आहेत. या बाईक्सना आरपीएफच्या विविध पोस्टजवळ तैनात ठेवण्यात येणार आहे. कर्जत, नेरळ, आसनगाव, टिटवाळा, कल्याण, कुर्ला, घाटकोपर, भायखळा अशा आरपीएफच्या ठाण्यांना या बाईक देण्यात येणार आहेत.

राॅयल एनफिल्डचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या जवानांना सुपूर्द केल्या जातील. अापत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी या बाइक उपयुक्त ठरणार अाहेत. पोस्ट अाणि अाऊटपोस्ट जवानांना या बाइक दिल्या जातील.

- सचिन भालोदे, सुरक्षा अायुक्त, अारपीएफ विभाग, मध्य रेल्वे

पुढील बातमी
इतर बातम्या