कल्याण 'पत्री' पुलाच्या कामासाठी पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वे मुंबई विभागातील कल्याण येथे पत्री पूल रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी रेल्वेमार्गावर ७६.६७ मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी ४ ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक संचालीत करणार आहे. ४ ब्लॉक पैकी २ ब्लॉकचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आला आहे.

ब्लॉक १ : शनिवार दि. २१.११.२०२० रोजी सकाळी १०.१५ ते दुपारी २.१५ पर्यंत

उपनगरी गाड्या रद्द

  • डोंबिवली ते कल्याण स्थानका दरम्यान सकाळी ९.५० ते दुपारी २.१५ दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. 
  • ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत / कसारा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.  
  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला / ठाणे / डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

गाड्यांचे डायव्हर्शन

  • 02168 मंडुआडीह- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष
  • 01059 लोकमान्य टिळक टर्मिनस -छपरा विशेष
  • 02542 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर विशेष
  • 01061 लोकमान्य टिळक टर्मिनस -दरभंगा विशेष 

वरील या गाड्या दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे वळविण्यात येणार आहेत. कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्याना भिवंडी रोड आणि दिवा येथे थांबा देण्यात येईल.

गाड्यांचं नियमन

  • 02812 हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (टिटवाळा येथे)
  • 01094 वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (खडवली येथे)
  • 02617 एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन विशेष (दिवा जवळ)
  • 04151 कानपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाड्या 
  • १५ ते १०५ मिनिटांसाठी थांबविण्यात येतील.  

गाड्यांचं वेळापत्रक पुन:निर्धारण 

  • 01071 लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी विशेष २१.११.२०२० रोजी दुपारी २.०० वाजता सुटेल
  • 01093 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी विशेष दि. २२.११.२०२० रोजी मध्यरात्री ०१.०० वाजता सुटेल.

ब्लॉक २: रविवार दि. २२.११.२०२० रोजी सकाळी ९.५० ते दुपारी १.५० पर्यंत 

उपनगरी गाड्या रद्द

  • डोंबिवली ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी ९.२० ते दुपारी १.५० दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.  
  • ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत / कसारा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. 
  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज ते कुर्ला / ठाणे / डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

गाड्यांचे डायव्हर्शन

  • 03201 पाटणा- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष
  • 02187 जबलपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष
  • 02168 मंडुआडीह - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष
  • 01055 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर विशेष
  • 02542 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर विशेष
  • 01061 लोकमान्य टिळक टर्मिनस - दरभंगा विशेष 

वरील गाड्या या मध्य रेल्वेच्या दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे वळविण्यात येणार आहेत. कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्याना भिवंडी रोड आणि दिवा येथे थांबा देण्यात येणार आहे.

गाड्यांचं नियमन 

  • 08225 हटिया- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष (टिटवाळा येथे).
  • 01094 वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (खडवली येथे).
  • 02617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन विशेष (दिवा जवळ).
  • २० मिनिट ते १०५ मिनिटांसाठी थांबविण्यात येतील.

गाड्यांचं वेळापत्रक पुनःनिर्धारण 

  • 01071 लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी विशेष दि. २२.११.२०२० रोजी दुपारी १.४० वाजता सुटेल.
  • 02188 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-जबलपूर विशेष दि. २२.११.२०२० रोजी दुपारी २.५५ वाजता सुटेल.
  • 02586 लोकमान्य टिळक टर्मिनस-बरौनी विशेष दि. २२.११.२०२० रोजी दुपारी २.०० वाजता सुटेल.

पुढील बातमी
इतर बातम्या