मध्य रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक

ठाणे आणि दिवा स्थानकामधील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांचं काम मध्य रेल्वेतर्फे हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक घेतला जाणार असून काही लोकल गाड्या देखील रद्द करण्यात येतील. तर काही लोकल अंशतः रद्द होणार आहेत.

कधी?

ठाणे आणि दिवा स्थानकामधील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांच्या कामसाठी गुरुवार २७ सप्टेंबरपासून ७ ऑक्टोबरपर्यंत काही फेऱ्या रद्द आणि काही फेऱ्या अंशत: रद्द केल्या जाणार आहेत.

रद्द होणाऱ्या फेऱ्या?

  • २८ सप्टेंबरपासून ६ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ५.५७ वाजताची डोंबिवली-सीएसएमटी लोकल रद्द 
  • २७ सप्टेंबरपासून ६ ऑक्टोबरपर्यंत संध्याकाळी ५.१५ वजताची ठाणे ते दादर लोकल रद्द 
  • २७ सप्टेंबरपासून ६ ऑक्टोबरपर्यंत संध्याकाळी ५.५८ वाजताची ठाणे ते डोंबिवली लोकल रद्द 
  • २८ सप्टेंबरपासून ५ ऑक्टोबरपर्यंत रात्री ११.१२ वाजताची सीएसएमटी ते ठाणे लोकल रद्द

अंशत: रद्द होणाऱ्या फेऱ्या

  • सकाळी ७.२९ वाजताची डोंबिवली लोकल २८ सप्टेंबरपासून ७ सप्टेंबरपर्यंत ठाण्याहून सकाळी ७.५२ वाजता सुटणार आहे
  • संध्याकाळी ५.५३ वाजताची सीएसएमटी लोकल २७ सप्टेंबरपासून ६ ऑक्टोबरपर्यंत ठाण्यापर्यंत धावणार आहे
  • संध्याकाळी ६.२२ वाजताची सीएसएमटी लोकल २७ सप्टेंबरपासून ६ ऑक्टोबरपर्यंत ठाण्यापर्यंत धावणार आहे
पुढील बातमी
इतर बातम्या