उन्हाळी सुट्टीसाठी 'मरे'च्या विशेष गाड्या

उन्हाळी सुट्टी लागली की अनेक जण आपल्या गावी किंवा फिरायला जाणं पसंत करतात. याचसाठी मुंबईबाहेर जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई-नागपूर आणि साईनगर शिर्डी ते हजरत निजामुद्दीन दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मुंबई-नागपूर विशेष गाड्या

02073 मुंबई -नागपूर सुपरफास्ट ही गाडी 28 एप्रिलला रात्री 11.55 वाजता रवाना करण्यात येणार असून, दुसऱ्या दिवशी सायंकाळी 3.00 वाजता ही गाडी नागपूर स्थानकात दाखल होईल. तर परतीच्या प्रवासाला 02074 ही गाडी 30 एप्रिलला नागपूर स्थानकातून दुपारी 12.50 वाजता रवाना करण्यात येणार असून, दुसऱ्या दिवशी पहाटे 3.25 वाजता सीएसटी स्थानकात पोहोचेल. 

तसेच 02075 मुंबई-नागपूर विशेष गाडी 1 मे रोजी रात्री 11.55 वाजता रवाना करण्यात येणार असून, नागपूर स्थानकात ही गाडी दुपारी 3 वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासाला 02076 ही गाडी 2 मे रोजी सायंकाळी 4.15 वाजता नागपूर स्थानकातून रवाना करण्यात येणार असून, सकाळी 8.15 वाजता सीएसटी स्थानकात दाखल होईल. या गाड्यांना कल्याण, इगतपूरी, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा या स्थानकांत थांबे देण्यात आले आहेत.

साईनगर शिर्डी ते हजरत निजामुद्दीन विशेष गाड्या

04411 साईनगर शिर्डी-हजरत निजामुद्दीन ही वातानुकुलित विशेष गाडी 26 एप्रिल ते 28 जून दरम्यान प्रत्येक बुधवारी साईनगर शिर्डी स्थानकातून सकाळी 10 वाजता रवाना करण्यात येणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी 9.40 वाजता हजरत निजामुद्दीन स्थानकात दाखल होईल. तर परतीच्या प्रवासाला 04412 ही वातानुकुलित विशेष गाडी 25 एप्रिल ते 27 जून दरम्यान दर मंगळवारी हजरत निजामुद्दीन स्थानकातून रात्री 12.10 वाजता रवाना करण्यात येणार असून, त्याच दिवशी रात्री 11.15 वाजता साईनगर शिर्डी स्थानकात दाखल होईल.

पुढील बातमी
इतर बातम्या