मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत

File photo
File photo

मध्य रेल्वेच्या करीरोड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यानं जलद मार्गावरची लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. करीरोड स्थानकाजवळ एक एक्स्प्रेस थांबली असून त्यामागे लोकल देखील रखडली आहे. यासंदर्भातील वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. 

अद्याप रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. लोकल सेवा कधीपर्यंत पूर्ववत होईल, याबाबतही कोणतीच माहिती नाही. 

तांत्रिक बिघाडामुळे गेल्या अर्ध्या तासांपासून जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. फास्ट ट्रॅकवरील रेल्वे एकाच जागेवर खोळंबल्या आहेत. तर अप लाईनवरील फास्ट ट्रॅकवरील रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. 

मध्य रेल्वेच्या फास्ट ट्रॅकवर लोकल ठप्प झाल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. बराच काळ लोकल ट्रॅकवरच थांबून राहिल्यानं, नागरिकांनी ट्रेनमधून उतरुन स्लो ट्रॅककडे मोर्चा वळवला. रखडलेली एक्सप्रेस बाजूला काढण्यात आली आहे. मात्र तरीही अद्याप वाहतूक विस्कळीतच आहे. 


पुढील बातमी
इतर बातम्या