रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सायन आणि माटुंगा स्थानकादरम्यान रुळाला तडा गेला आहे. रुळाला तडा गेल्यानं सीएसएमटीहून कुर्ल्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास रेल्वे रुळाला तडा गेला आहे.
ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे रुळाला तडा गेल्यानं सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे. अनेकजण रेल्वे रुळावर उतरून अन्य मार्गानं निघाले आहेत.