मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

भांडुप ते कांजूरमार्ग रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बुधवारी सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कर्जतवरून सुटलेल्या जलदमार्गावरील लोकलमध्ये भांडूप आणि कांजूरमार्ग स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली होती. सध्या ही वाहतूक उशिरानं सुरू आहे.

वाहतूक उशिरा

कर्जतहून सुटलेल्या जलद लोकलमध्ये भांडुप ते कांजूर मार्ग या स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. यामुळे कर्जतहून सीएसएमटीकडे येणाऱ्या अनेक लोकलवर याचा परिणाम झाला. 9 वाजताच्या दरम्यान हा बिघाड दुरुस्त झाला. मात्र ऐन कामाच्या वेळी लोकल बंद पडल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. लोकलमध्ये ताटकळत बसल्यामुळे कामावर जायलाही अनेकांना उशीर झाला.

पुढील बातमी
इतर बातम्या