कोरोनाचा एसटीतील 'त्या' भरती प्रक्रियेला फटका

मार्च महिन्यापासून टाळेबंदी लागली आणि एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली. याशिवाय एसटीचे विविध कामकाजही बंद झाले. यात राज्यात एसटीच्या भरती प्रक्रियेवरही परिणाम झाला. कोरोनाचा फटका एसटीच्या सेवेत रुजू होणाऱ्या सुमारे ३ हजार चालक कम वाहकांनाही बसला आहे.

कोरोनाकाळात पूर्णपणे प्रशिक्षण बंद करण्यात आले. यामध्ये २१३ महिलांचाही समावेश आहे. एसटी महामंडळाने नवीन चालक कम वाहकांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाला आणि कोरोनाकाळात एसटी महामंडळाने प्रशिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला. सध्या लॉकडाऊन असल्याने प्रशिक्षण पूर्णपणे बंदच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलांच्या प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षांचा आहे. यातील ५ महिने वाया गेले पुढील आदेश येईपर्यंत प्रशिक्षण बंद ठेवले आहे. २१ आदिवासी महिला डिसेंबर २०२० पर्यंत, तर त्यानंतर त्वरित उर्वरित महिलाही एसटीच्या सेवेत रुजू होणार होत्या, परंतु त्यांना एप्रिलनंतरचाच मुहूर्त मिळणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या