बेस्टच्या ११० कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात

मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट उपक्रमामार्फत वाहतूक सेवा पुरवली जात आहे. परंतु, आता या कर्मचाऱ्यांनाच कोरोनानं टार्गेट केलं आहे. बेस्टच्या एकूण २०८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. असं असलं तरी कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही जास्तच आहे.

बेस्ट उपक्रमामध्ये कार्यरत असणाऱ्या आणि कोरोनावर यशस्वीरित्या मात करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ११० झाली आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले कर्मचारी कर्तव्य भावनेने वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, बॅंक कर्मचारी यांना परिवहन सेवा अव्याहतपणे पुरवित असल्याची माहिती बेस्ट उपक्रमानं दिली. तसंच, मुंबईतील वीज पुरवठा विनाखंडित ठेवण्यासाठी देखील झटत आहेत.

बेस्टच्या काही कर्मचाऱ्यांच्या कोरोनाशी दोन हात करताना मृत्यू झाला आहे. त्यापैकी ४ कामगारांच्या वारसांना बेस्ट उपक्रमात नियुक्तीचा निर्णय जाहीर केला आहे.


हेही वाचा -

पुढील बातमी
इतर बातम्या