गैरहजर रहिल्यामुळं बेस्टमधील ३० कर्मचारी बडतर्फ

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याना वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बेस्टनं आपली वाहतूक सेवा सुरु केली. दररोज बेस्टचे अनेक कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. मात्र, काही कर्मचारी कामावर हजर राहण्याचे आदेश मिळूनही गैरहजर गैरहजर राहत आहेत. अशा एकूण ३० कर्मचाऱ्यांना आतापर्यंत बेस्टउपक्रमानं बडतर्फ केलं आहे. 

मागील आठवड्यापासून ही कारवाई सुरू असून, सोमवारी आणखी १२ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये चालक, वाहक, वाहतूक निरीक्षक व अन्य कर्मचारी आहेत. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देण्याऐवजी अनेक कर्मचारी गैरहजर राहिले. 

परिवहन सेवेबरोबरच विद्युत, अभियंता, सुरक्षा कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अशा कर्मचाऱ्यांना चार्जशीट देऊन कामावर रुजू होण्याचे आदेश दिले गेले. परंतु अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अशांवर कठोर कारवाई केली जात आहे. २२ जूनपासून सुरू झालेल्या कारवाईत पहिल्यांदा ११ जणांना बडतर्फ करण्यात आले. यामध्ये बॅकबे, धारावी, देवनार, दिंडोशी आगारातील चालक-वाहकांचा समावेश होता. चार दिवसानंतर आणखी सात जणांवर कारवाई के ली. मात्र २९ जूनला तब्बल १२ कर्मचाऱ्यांवर कारवाई झाल्याची माहिती समोर येत आहे. आणखी काही जणांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.

पुढील बातमी
इतर बातम्या