रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लोकल; सोशल डिस्टंन्सिंगचे तीन-तेरा

तब्बल २ महिन्यांनी शुक्रवारी सकाळी मध्य रेल्वेची लोकल रुळावर आली. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनानं लोकल सुरू केली. कसारा सीएसएमटी, कर्जत सीएसएमटी आणि कल्याण सीएसएमटी या मार्गावर विशेष लोकल धावत आहेत. मात्र, या लोकलमध्ये सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडाल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. 

कल्याण स्थानकातून सुटणारी पहिली लोकल ही सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी ठाकुर्ली स्थानकात आली. तसेच कर्जत येथून सुटलेली लोकल ठाकुर्ली मध्ये सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास आल्याचं सांगण्यात आलं. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये रेल्वे कर्मचारी मास्क लावून नियमीतपणे प्रवास करत असल्याचं दिलसत आहे. यामध्ये सोशल डिस्टंन्सिंग नाही.

 

रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये त्यांबद्दल चर्चा सुरू आहे. प्रवासी एकमेकांजवळ उभे होते, एकमेकांजवळ बसले होते असे चित्र स्पष्ट दिसत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या