दादर ते मडगाव मार्गावर रोज धावणार स्पेशल ट्रेन

(File Image)
(File Image)

मध्य रेल्वेनं (CR) २ मार्च २०२१ पासून अतिरिक्त प्रवाशांची गर्दी दूर करण्यासाठी दादर ते मडगाव दरम्यान दररोजची विशेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन नंबर ०११५१/०११५२ दादर-मडगाव-दादर जनशताब्दी सुपरफास्ट स्पेशल आता आठवड्यातून पाच दिवसांऐवजी दररोज धावेल.

दादर-मडगाव जनशताब्दीचे विस्तारित बुकिंग २८ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे. दररोज धावण्यासाठी मुंबई-मडगाव जनशताब्दी स्पेशल ०११५१/०११५२ ट्रेन क्रमांक दादर-मडगाव-दादर जनशताब्दी सुपरफास्ट स्पेशल आता २८ फेब्रुवारीपासून धावेल.

ट्रेन क्रमांक ०१११११ दररोज सकाळी ५.२५ वाजता दादरहून सुटेल आणि त्याच दिवशी मडगाव इथं २.१० वाजता पोहोचेल, असे सीआर अधिकाऱ्यानं सांगितलं. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०१११२ ही मडगावहून दररोज २.४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दादरला ११.१५ वाजता पोहोचेल.

दादर - मडगाव जन शताब्दी एक्स्प्रेस दादर मध्य ते मडगाव जंक्शन दरम्यान धावणाऱ्या भारतीय रेल्वेची प्रमुख ट्रेन आहे. रेल्वेनं व्यापलेले एकूण अंतर ५७२ किमी आहे आणि ट्रेनचा सरासरी वेग ६५ किमी / ताशी आहे. या मार्गावर एकूण १० थांबे आहेत. या ट्रेनमध्ये एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कार (ईसी), एसी चेअर कार (सीसी) आणि सेकंड क्लास (२ एस) सीटिंग कोच आहेत.

गर्दी वाढविणारी ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थावीम आणि मडगाव जंक्शन या स्थानकांवर थांबेल.


पुढील बातमी
इतर बातम्या