सलग तिसऱ्या दिवशी डिझेल स्वस्त

(Representational Image)
(Representational Image)

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत एका महिन्यात १० डॉलरची घसरण झाली आहे. त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी देशात डिझेलटे दर कमी करण्यास सुरूवात केली आहे. सलग तिसऱ्या दिवशी डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. शुक्रवारी देशभरात डिझेल २० पैशांनी स्वस्त झालं आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी तब्बल चार महिन्यानंतर डिझेलचे दर घटवले होते.  त्यानंतर गुरुवारी डिझेल २० पैशांनी स्वस्त केलं होतं. शुक्रवारी पुन्हा एकदा कंपन्यांनी डिझेलमध्ये २० पैशांची कपात केली. तीन दिवसात डिझेल ६० पैशांनी स्वस्त झालं आहे. तर पेट्रोलचा भाव सलग ३४ व्या दिवशी स्थिर आहे.

मुंबईत पेट्रोलची किंमत १०७.८३ रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. तर डिझेलची किंमत ९६.८४ रुपये प्रति लिटर इतकी आहे. पेट्रोलच्या दरांत ४ मे नंतर ४१ वेळा वाढ झाली. तर डिझेलच्या दरांमध्ये ३७ वेळा वाढ झाली. तर तीन वेळा दरांमध्ये घट करण्यात आली. सलग तेलांच्या किमतींमध्ये होणाऱ्या वाढीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, ओदिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह १५ राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती शंभर रुपयांच्यावर गेल्या आहेत.

दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

पुढील बातमी
इतर बातम्या