Mumbai Rains मुसळधार पावसामुळं रेल्वे वाहतूक ठप्प, अनेक गाड्या रद्द

मुंबईत मंगळवारी संध्याकाळापासून पावसानं जोर धरला. मुसळधार पावसामुळं मुंबईची लाइफलाइन लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. मध्ये रेल्वे मार्गावरील अनेक लोकल रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली. त्याशिवाय, पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीलाही ब्रेक लागल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळं सकाळी कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना मोठ्या त्रासाला समोरं जावं लागतं आहे. 

मध्य रेल्वे स्थानकातील सायन, परळ स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यानं रेल्वे वाहतूक रद्द केली आहे. मध्य व पश्चिम रेल्वेनं याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळं रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी जमली असून, यामुळं प्रवाशी कामावर पोहोचण्यासाठी रेल्वे रुळावरून मार्ग काढत आहेत. 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रात्रभर पडत असलेल्या पावसामुळं मुंबईचे रस्ते पाण्याखाली गेले असून त्यामुळं रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचप्रमाणं रेल्वे वाहतुकही ठप्प झाली आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला. त्याशिवाय, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या