ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत

विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ही वायर तुटल्यानं प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत. तसंच, मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. २ तास उलटून गेले तरी मध्य रेल्वेची सेवा अद्याप विस्कळीतच आहे. त्यामुळं प्रवाशांच्या सेवेसाठी केडीएमसीकडून कल्याण ते बदलापूर शटल सेवा सुरू करण्यात आली आहे. तसंच, जादा बसेसही सोडण्यात आल्या आहेत. 

प्रवाशांची गर्दी

मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक विस्कळीत झाल्यानं विठ्ठलवाडी स्थानकासह उर्वरित स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड जमली आहे. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ओव्हरहेड वायर तुटल्यानं प्रवाशांना लेट मार्कचा सामना करावा लागणार आहे. तसंच, मुंबईला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असली तरी त्याचा फटका कर्जतच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतूकीला देखील बसला आहे.

दुरुस्तीचं काम हाती

दरम्यान, या ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती मिळताच मध्य रेल्वे प्रशासनानं तातडीनं दुरुस्तीच काम हाती घेतलं आहे. मात्र, रेल्वे सेवा पुर्वपदावर कधी येणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या