मध्य रेल्वेच्या स्थानकांत फेब्रुवारीपासून ई-बाईक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील स्थानकातून इलेक्ट्रिक बाईकची सेवा सुरू होणार आहे. येत्या फेब्रुवारीपासून प्रवाशांना कुर्ला रेल्वे स्थानकातून ई-बाईकचा वापर करून प्रवास करता येणार आहे. मध्य रेल्वे आणि युलू या मोबाईल ऍपद्वारे ई-बाईकची व्यवस्था करण्यात येणार आहे. कुर्ला स्थानकाच्या पश्‍चिम दिशेकडील बाजूस ८० ई-बाईकची व्यवस्था करण्यात आली आहे. तर त्यानंतर सीएसएमटी, भायखळा, दादर, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे या स्थानकांवर ही सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सोईस्कर होण्यासाठी ई-बाईक सुविधा देण्यात आली आहे. कुर्ला भागात रिक्षा, टॅक्‍सी, बससाठी प्रवाशांना रांगा लावाव्या लागतात. यासाठी कुर्ला आणि वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी)दरम्यान कनेक्‍टिव्हिटी देण्यासाठी खासकरून ई-बाईक सेवा सुरू करण्यात येत आहे. दरम्यान, कुर्ल्यानंतर सीएसएमटी, भायखळा, दादर, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे या स्थानकांवर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

प्रवाशांना मोबाईलमध्ये युलू ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे. ई-बाईक अनलॉक करण्यासाठी ५ रुपये द्यावे लागतील. त्या प्रवासासाठी त्यांच्याकडून प्रतिमिनीट दीड रुपये शुल्क आकारले जाणार आहे. युलू मोबाईल ऍप डाऊनलोड करावे लागणार आहे. ई-बाईक अनलॉक करण्यासाठी प्रवाशांना क्‍यूआर कोड स्कॅन करावा लागेल किंवा वाहन क्रमांकाची नोंद करून ई-बाईक अनलॉक करता येणार आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या