रेल्वेकडून फर्स्ट क्लासच्या डब्याला सुट्टी

  • संतोष मोरे & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

मुंबई - रेल्वेने मध्यम पल्ल्यांच्या गाड्यांमधील पहिल्या श्रेणीचा आरक्षित डबा कमी करण्यास सुरुवात केलीये. रेल्वेच्या भाड्यात वाढ झाल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार 20 ऑक्टोबरला 19011 डाउन या मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या गुजरात एक्स्प्रेसमधील फर्स्ट क्लासचे दोन डबे कमी होतील. त्याऐवजी एक एसी चेयरकार आणि व्दितीय श्रेणीचा डबा लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय. याचप्रमाणे 22 ऑक्टोबरला 19012 अप अहमदाबाद मुंबई सेंट्रल गाडीतही हा बदल होईल. फर्स्ट क्लासचे डबे कमी केले, तरी प्रत्यक्षात जागा वाढणार आहेत. त्यामुळे जास्त प्रवासी या गाडीतून प्रवास करतील, असं पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी गजानन म्हापूतरकर यांनी सांगितलंय. यामुळे रेल्वेच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. या बदलामुळे ही गाडी आता 22 डब्यांची होईल.

पुढील बातमी
इतर बातम्या