'जीटीबी स्टेशनला कोळीवाडा नाव द्या'

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

कोळीवाडा - महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. एकीकडे राजकीय पक्षांमध्ये श्रेयवाद सुरू आहे. त्यातच आता गुरु तेग बहादुर नगरला कोळीवाडा नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

राम मंदिर स्टेशनच्या उद् घाटन सोहळ्यादरम्यान कोळी, आगरी बहुजन समाज यांनी ही मागणी करत रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना यासंदर्भाचे निवेदनही दिले आहे. ज्याप्रमाणे व्हीटी स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल नाव दिलं, ओशिवरा स्टेशनला राम मंदिर दिलं, तसेच एलफिन्स्टनला प्रभादेवी असं नाव देण्याची चर्चा असताना आता गुरू तेग बहादुरनगरला कोळीवाडा नाव द्यावं ही मागणी आहे. त्यामुळे मुंबईत पाहता-पाहता सर्व स्टेशनची नावं या राजकारणी आणि समाज कार्यकत्यांमुळे बदलणार तर नाही ना असा प्रश्न मुंबईकरांना पडत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या