रेल्वे पोलिसांची इमानदारी

एका प्रवाशाची 11 हजार रुपयांची रोकड,12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि घड्याळ असलेली बॅग रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला परत केली आहे. विजय शर्मा(30) असं या प्रवाशाचे नाव असून, तो वेरावल-पुणे एक्सप्रेसने सुरतवरून मुंबईला येत होता. मात्र काही कामासाठी त्याला वापी येथे उतरावं लागलं.

त्यावेळी घाईघाईत तो आपली लॅपटॉप बॅग ट्रेनमध्ये विसरला. याबद्दल त्याने रेल्वे पोलिसांशी आणि नातेवाईक अनिल गर्ग यांच्याशी संपर्क साधला. ही ट्रेन जेव्हा रात्री साडेबारा वाजता वसईला आली तेव्हा रेल्वेचे पोलीस अधिकारी विजय शर्मा यांनी ही बॅग आपल्या ताब्यात घेतली आणि त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केली.

गेल्या काही दिवसांपासून रेल्वेमधील अशा घटना दिवसेंदिवस वाढत आहेत मात्र आम्ही प्रवाशांचे राहिलेले सामान त्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. काहीवेळा प्रवासी सामान परत न मिळाल्याचा आरोप देखील करतात, त्यामुळे आम्ही सामान परत करताना ज्याच्या हातात देतो त्याची सही करूनच खात्री करून सामान परत करतो

सुरेश चंद्र, रेल्वे पोलीस अधिकारी

पुढील बातमी
इतर बातम्या