धक्कादायक! मध्य रेल्वेच्या डब्यांमध्ये मानवी मलमूत्र

(Image: Twitter Video Screenshot)
(Image: Twitter Video Screenshot)

मध्य रेल्वेच्या (CR) हार्बर लाईनच्या प्रवाशांनी रेल्वेतल्या काही डब्यांमध्ये मानवी मलमूत्र विशेषतः आसनांवर टाकल्याच्या तक्रारी केल्या आहेत. ट्विटरवर पोस्ट केलेल्या तक्रारीनुसार प्रवाशांनी असे प्रकार वारंवार घडत असल्याचं म्हटलं आहे.

प्रवाशांनी एक व्हिडिओ व्हाययरल केला आणि सांगितलं की, त्यांनी सकाळी ९ वाजून ६ मिनिटाला सुटणाऱ्या बेलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)ला जाणाऱ्या दोन पुरुष डब्यांमध्ये हा प्रकार घडला आहे.

शिवाय, रेल्वे अधिकाऱ्यांनी अशा लोकांचा शोध घ्यावा आणि भविष्यात अशा प्रकारचे किळसवाणे प्रकार टाळण्यासाठी त्यांना शिक्षा करावी, असं आवाहन व्हिडिओद्वारे केलं आहे.

या पोस्टवर उत्तर देताना मध्य रेल्वेच्या आरपीएफनं मुंबईतील मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांनाही या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, हार्बर लाईनमध्ये ही एक सामान्य समस्या आहे. कारण प्रवास करणारे बरेच लोक दारू पिऊन असतात. मग दारूच्या नशेत आणि दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी लोकं या गोष्टी करतात. दुसर्‍या प्रवाशानं अशी संकल्पना सुचवली की, मध्य रेल्वेनं दिवसातील पहिला प्रवास करण्यासाठी गाडी सुटण्यापूर्वी सर्व डिब्बे तपासले पाहिजेत.

मागील वर्षी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-पनवेलकडे जाणाऱ्या ट्रेनच्या एकाच डब्यात दोनदा अशी घडली होती. तथापि, हे सूचित करते की सार्वजनिक वाहतुकीत अशा किरळवाण्या घटनांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं पसरण्याची शक्यता आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या