हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार लवकरच, जुलैपासून मुंबईकरांना मँचेस्टर (manchestar), अॅमस्टरडॅम (amsterdam) आणि नेदरलँड्स (netherlands) येथे प्रवास करता येईल.
इंडिगोने मुंबईला (mumbai) मँचेस्टर, युनायटेड किंग्डम आणि मुंबईला अॅमस्टरडॅम, नेदरलँड्सशी जोडणारा पहिलाच लांब पल्ल्याच्या मार्गाची घोषणा केली आहे. 1 जुलैपासून मँचेस्टरसाठी उड्डाणे आणि 2 जुलैपासून अॅमस्टरडॅम आणि नेदरलँड्ससाठी उड्डाणे सुरू होतील.
बोईंग 787-9 ड्रीमलायनर विमान या मार्गावर आठवड्यातून तीन उड्डाणे चालवण्यासाठी वापरले जाईल. इंडिगो (indigo) ही भारत आणि उत्तर यूके दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी देणारी एकमेव विमान कंपनी आहे. याआधी, जेट एअरवेजने 2019 मध्ये त्यांचे ऑपरेशन बंद होण्यापूर्वी मुंबई ते मँचेस्टर मार्गावर बोईंग 777 चालवले होते.
मुंबई ते मँचेस्टरला जाणारी विमाने मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी उड्डाण घेतील तर मुंबई ते अॅमस्टरडॅम बुधवार, शुक्रवार आणि रविवारी उड्डाण घेतील.
मँचेस्टर विमानतळाचे व्यवस्थापकीय संचालक ख्रिस वुडरूफ म्हणाले, "या नवीन मार्गामुळे आम्ही इंग्लंडच्या उत्तरेत एकमेव विमानतळ बनवले आहे जे भारताशी थेट जोडलेले आहे. ज्यामुळे युरोपमधील सर्वात चांगल्या प्रकारे जोडलेल्या विमानतळांपैकी एक म्हणून आमच्या हवाई सेवेचा दर्जा मजबूत झाला आहे."