मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला

मुंबई - मुंबई विमानतळावर विमानाच्या इंजिनात टेक ऑफच्या काही क्षणांपुर्वी स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंडिगो एअरलाईनचे एअर बस 320 हे विमान 6E-248 मुंबईवरून दिल्लीला रवाना होण्याच्या प्रतीक्षेत असतानाच विमानात अचानक स्फोट झाला. तपासणी केली असता डाव्या इंजिनाला आग लागली असल्याचं समोर आले. या आगीवर तात्काळ ताबा मिळवण्यात आला. या स्फोटाने इंजिनाच्या टर्बाईन ब्लेड क्षतीग्रस्त झाल्या आहेत. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या