श्रमिक विशेष गाड्यांबाबतची माहिती खोटी; मध्य रेल्वेचं स्पष्टीकरण

मुंबईसह राज्यभरात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत आहे. या लॉकडाऊनच्या शक्यतेमुळं गतवर्षी प्रमाणे हालत होऊ नये यासाठी बाहेरच्या राज्यात राहणाऱ्या कामगारांनी घरची वाट धरली आहे. मात्र, कामगार गावी जात असले तरी काहींनी सोशल मीडियावर 'मध्ये रेल्वे श्रमिक विशेष गाड्या चालवत आहे', अशी माहिती सोशल मीडियावर दिली. मात्र ही माहिती अफवा असल्याचं मध्य रेल्वेनं स्पष्ट केलं.

रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, सोशल मीडियामध्ये श्रमिक विशेष गाड्या चालविल्या जात असल्याची चुकीची माहिती पसरविली जात आहे.

कोणत्याही श्रमिक विशेष गाड्या' चालविल्या जात नाहीत / नियोजन नाही. रेल्वे फक्त उन्हाळी विशेष गाड्या आणि नियमित विशेष गाड्या चालवत आहे. लोकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे. केवळ कंफर्म तिकीट धारकांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी आहे.

कृपया आपल्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड-१९ योग्य वर्तन अनुसरण करा. अधिकृत माहितीसाठी @Central_Railway या सोशल मीडिया हँडलचे अनुसरण करा किंवा www.cr.indianrailways.gov.in ला भेट द्या.

पुढील बातमी
इतर बातम्या