आता ऑनलाईन तिकीट महाग!

आतापर्यंत रेल्वेचं तिकीट बुकिंग ई-वॉलेट किंवा पेमेंट अॅपच्या माध्यमातून करणं सहजसोपं होतं. यासाठी प्रवाशांना चांगल्या डिल्स आणि ऑफर्स मिळत होत्या. मात्र यापुढे या थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन तिकीट बुक करताना प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागतील.

मिळालेल्या माहितीनुसार प्रवासी जर भारतीय रेल्वेसाठीचं तिकीट बुकिंग IRCTC च्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही थर्ड पार्टी अॅप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून करत असतील तर त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागतील.

तर जास्त पैसे द्या

रेल्वेचं तिकीट पेटीएम, मोबिक्विक, मेक माय ट्रिप, यात्रा आणि क्लियर ट्रिप या थर्ड पार्टी अॅप किंवा वेबसाइटवरून बुक करताना प्रवाशांना जास्तीचं शुल्क भरावं लागणार आहे. या थर्ड पार्टी अॅप आणि वेबसाइटवरून तिकीट बुक करणाता प्रवाशांना 12 रुपये अधिक खर्च करावे लागतील. याव्यतिरिक्त मोबाइल वॉलेटचा वापर करून तिकट बुक करतानाही हा नियम लागू होईल.

म्हणून अतिरिक्त चार्ज

आयआरसीटीसी थर्ड पार्टी अॅप आणि वेबसाइटकडून वार्षिक देखभाल खर्च वसूल करणार आहे. याव्यतिरिक्त कॅशबॅक करताना 15 रुपये आणि डिस्प्ले जाहिरातीसाठी 5 रुपये शुल्क या कंपन्यांकडून वसूल करेल. शिवाय या अॅप किंवा वेबसाइटवरून इतर कोणत्याही कंपनीचं उत्पादन विकलं जात असेल तर त्यांच्याकडून प्रति तिकीटच्या मागे 25 रुपये दर वसूल करेल. त्यामुळे यापुढे या अॅपवरून तिकीट बुक केल्यास तुम्हाला अतिरिक्त शुल्क मोजावे लागतील.

कॅसलेशन, रिफंडच्या नियमातही बदल

काही दिवसांपूर्वी आयआरसीटीसीने ऑनलाइन तिकीट कँसल करण्याच्या नियमांतही बदल केलं. नवीन नियमांनुसार यापुढे प्रवाशांना काउंटरवरून खरेदी केलेलं तिकीट यापुढे ऑनलाइन कँसल करता येणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या